रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन असतानाही विनाकारण फिरणार्यांना पोलिसांनी दणका दिली आहे. तालुक्यातील कोतवडे आणि काळबादेवी येथे विनाकारण फिरणार्या पाच जणांवर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संदेश तुकाराम मांडवकर (वय 42), राकेश कृष्णा मांडवकर (30, धामेळेवाडी, कोतवडे), महेश मारुती भोळे, दिनेश विशाल शिवलकर, कुणाल रमाकांत मयेकर (सर्व रा. काळबादेवी) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. कोतवडे बाजारपेठ येते संदेश व राकेश मांडवकर हे विनाकारण दुचाकीवरून फिरताना ग्रामीण पोलिसांच्या गस्ती पथकाला आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता ते कोणतीही समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाहीत. या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल केले. काळबादेवी येथील महेश भोळे, संदेश शिवलकर आणि कुणाल मयेकर हे पोलिसांना विनाकारण फिरताना आढळले. त्यांचीही पोलिसांनी चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे दिली नाही. संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणार्या संशयितांवर गुन्हा दाखल केला करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली.