राजापूर :-प्रवासाचा कोणताही परवाना नसताना अवजड वाहनातून तब्बल 74 प्रवाशांची वाहतूक केल्या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातीवले चेकपोस्ट येथे ही कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश लागू आहेत. असे असताना व कोरोना संदर्भात प्रतिबंधक आदेश असताना 12 मे रोजी सकाळी 10 वा. विजय कुंजीलाल कोल (39 रा. सातना, मध्यप्रदेश) याने त्यांच्या ताब्यातील मालवाहू ट्रक (एम. पी. 20 / एच. बी. 7112) हा रत्नागिरी ते मध्यप्रदेश असे विनापरवाना कोणताही रत्नागिरी ते मध्यप्रदेश असे विनापरवाना व ई- पास नसताना 74 प्रवासी वाहतुक करीत असताना मुंबई- गोवा हायवे रोडवर हातिवले चेकपोस्ट , ता .राजापूर येथे सापडला. त्याच्यावर राजापूर पोलीस ठाण्यात भा.दं. वि. कलम 188, 269, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 व साथरोग नियंत्रण अधिनियम1987 चे कलम 3 तसेच मोटार वाहन कायदा कलम 66 (1), 192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.