रत्नागिरी:-शिमग्यासाठी गावात आलेल्या व नंतर लॉक डाऊनमुळे संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे गावात अडकून बसलेले अशोक पवार या दाम्पत्याला न्याय मिळाला. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना ट्विटरवर केलेल्या मेसेज मुळे त्यांनी तातडीने दखल घेऊन पवार दाम्पत्याला पुणे येथे पाठवण्याची व्यवस्था केली
पवार दाम्पत्य पुणे कोथरूड येथून शिमगा सणासाठी गावात आले होते लाॅकडाऊन मुळे ते गावातच अडकून बसले त्यांच्या पत्नीला मधुमेहाचा तीव्र त्रास असल्याने व जवळचे औषधही संपल्याने त्यांना पुणे येथे जाणे गरजेचे होते फणसवणे गावातील कार्यकर्ते पत्रकार सत्यवान विचारे यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी तातडीने त्यांना औषधे व जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या व याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांना स्थानिक पत्रकारांनी ट्विटरवर कळविले त्याची तातडीने दखल जिल्हा पोलीस अधीक्षक मुंढे यांनी घेऊन संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदय कुमार झावरे यांना याबाबत सूचना दिल्या त्यानि बाबत वस्तुस्थिती जाणून घेऊन पवार यांना पुणे येथे जाण्याची व्यवस्था करून दिली.त्यामुळे पवार दाम्पत्याने जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलिसांचे आभार मानले आहेत