राजापूर:- होम कोरोंटाइनचा शिक्का असलेले 5 चाकरमानी मुंबईहून राजापूर तारळ गावी रिक्षाने प्रवास करून आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. सर्व ठिकाणी लॉक डाउन असताना, नाक्या नाक्यावर पोलीस बंदोबस्त असताना हे 5 जण रिक्षा घेऊन मुंबईतून गावी आलेच कसे असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान तारळ ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज, गुरुवारी सकाळी संबंधितांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी केली आहे.