मज्जा-मस्ती करत मुलांनी घेतला दप्तरांविना शाळेचा आनंद .!

141

ल.ग.पटवर्धन शिर्के पशालेत दप्तरांविना शाळेचा उपक्रम.

संपूर्ण दिवस मुले रमली वेगवेगळया उपक्रमात.

या उपक्रमामुळे मुलांच्या चेहऱयावरील उत्साह झाला व्दिगुणीत.

रत्नागिरी

‘नाही पाठिवर ओझे, नाही शाळेत अभ्यास, नाही गृहपाठ आणि नाही परिपाठ, फक्त आणि फक्त एक उनाड दिवस’दप्तरांविना शाळा या उपकमांतर्ग शिर्के पशालेतील ल.ग.पटवर्धन पशालेतील तिसरी चौथीच्या मुलांनी एक दिवस मज्जा-मस्ती, दंगा करत विविध उपकमाचा मनसोक्त आनंद लुटला. अशा पकारची शाळा मुलांनी पहिल्यांदा अनुभवली. या दप्तरांविना शाळेत गाणी,पालखी नाचवणे, याशिवाय कलात्मक कौशल्याचे ज्ञानही मुलांना मिळाले आणि सर्वांनी एका पंगतीत बसून जेवण्याचा आनंद लुटला.

दिवसेंदिवस शैक्षणिक क्षेत्रात बदल होत असून परिणामी मुलांचा अभ्यासकम वाढत आहे. यामुळे मुलांना दररोज ओझ दप्तर घेवून शाळेत जावे लागते. या सगळ्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना त्यांच्या मनापमाणे आनंद घेता यावा म्हणून ल.ग.पटवर्धन शाळेने ‘दप्तरांविना शाळा’ हा उपकम नुकताच घेतला. सकाळी आठ ते दुपारी अडीचवाजेपर्यंत मुलांनी ‘फुल्ल टू धम्माल’ केली. पत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱयावरील आनंद ओसंडून वाहत होता.

श्रीकांत ढालकर यांनी मुलांना विविध पक्षांचे आवाज,काही गोष्टी सांगितल्या त्यामुळे मुलांना काही कलात्मक गोष्टी शिकता आले. त्यानंतर शिमगोत्सवात पालखी नाचवली जाते मात्र ती मुलांना दिली जात नाही, त्यामुळे हादेखील मुलांना लुटता यावा यासाठी पालखी मुलांच्याच हातात देवून नाचविण्यात आली. मुलांनी ढोल ताशांच्या तालावर सुरेख पध्दतीने पालखी नाचवली. त्यानंतर रंगबेरंगी ओढण्या घेवून वेगवेगळे कवायतीचे पकार,पात्यक्षिके मुलांनी उत्साहाने केले. याहून गंमतीचा विषय म्हणजे पायाने फुगे फोडणे, बादलीत बाŸल टाकणे, डोळे बंद करून डब्बा बाजूला करणे असे असंख्य खेळही याठिकाणी घेण्यात आले. त्यानंतर एकत्रित स्नेहभोजनचा आस्वाद घेवून या कार्यकमाची सांगता करण्यात आली.

शाळेत वर्षभर विविध उपकम घेण्यात येतातच मात्र एक दिवस मुलांसाठी तेही दप्तरांविना घ्यावी ही संकल्पना यापूर्वीच ठरली होती त्यामुळे हा उपकम पहिल्यांदाच आम्ही केला आणि तो यशस्वीदेखील झाला कारण पत्येक मुलांच्या चेहऱयावरील आनंद समाधान पाहून आम्हालाही खूप बरे वाटले अशी पतिकिया शाळेच्या मुख्याध्यापिका आसक्ती भोळे यांनी व्यक्त केले.

विशेष या सगळ्या उपकमात शाळेतील सर्व शिक्षक तितक्याच उत्साहाने सहभागी झाले होते. नेहमीच परिपाठाच्या विषयात असणारे शिक्षकही या उपकमामुळे विरंगुळा लुटता आला.