विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केले शैक्षणिक साहित्याचे वाटप
घरातील आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या व वडिलांचे छत्र हरवलेल्या चार होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च गाव विकास समिती करणार असून नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप या विद्यार्थ्यांना संघटनेच्या वतीने करण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील करंबेले गावातील कु.सोहम संतोष गेल्ये,अक्षय धावडे,शैलेश धावडे,तेजस धावडे या विद्यार्थ्यांना गाव विकास समितीच्या वतीने शैक्षणिक मदत केली जाणार आहे.वडिलांचे छत्र हरवल्याने मुलांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये व सदर विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेताना कोणत्याही शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये या हेतूने सामाजिक भावनेतून गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड,उपाध्यक्ष मंगेश धावडे,सरचिटणीस सुनील खंडागळे,देवरुख अध्यक्ष डॉ. मंगेश कांगणे यांच्या उपस्थितीत करंबेले गावात या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शैक्षणिक मदत करण्यात आली.गाव विकास समिती मार्फत दर वर्षी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते.आर्थिक गोष्टींमुळे मुलांचे शिक्षण कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नये या भावनेतून गाव विकास समितीचे पदाधिकारी आपल्या उत्पन्नातुन समाजातील गरीब व होतकरू मुलांना शैक्षणिक मदत करत असतात.याच उपक्रमा अंतर्गत यावर्षी संगमेश्वर मधील करंबेले गावातील सोहम संतोष गेल्ये,शैलेश अरविंद धावडे अक्षय अरविंद धावडे आणि तेजस अरविंद धावडे या विद्यार्थ्यांना गाव विकास समितीच्या वतीने शैक्षणिक मदत करण्यात आली.एकाच कुटुंबातील तीनही भावडांना गाव विकास समितीने शैक्षणिक मदत केली असून या तिन्ही भावंडांच्या कुटुंबातील आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने गाव विकास समितीने त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.या विद्यार्थ्यांचा माध्यमिक शिक्षणापर्यंत चा शिक्षणाचा खर्च गाव विकास समिती करणार असल्याची माहिती संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी दिली आहे.