रत्नागिरी:- जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 19 हजार 688 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 19 हजार 235 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2210 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 17 हजार 75 अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 7 ऑगस्ट 2020 अखेर एकूण 2 लाख 52 हजार 393 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 13 हजार 423 आहे.