खेड:- प्रधानमंत्री कृषी सिंचन पाणलोट विकास योजनेअंतर्गत दापोली प्रकल्प क्र.47 व 48 मिळून 16 पाणलोट समितीच्या 16 पाणलोट सचिवांचे मानधन तब्बल 7 वर्षापासून रखडले आहे. 7 वर्षे पगार नसल्याने पाणलोट सचिवांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
याप्रकरणी ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत लवकरच जिल्ह्यातील पाणलोट सचिव पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे. शासन परिपत्रकानुसार पाणलोट सचिवांना दरमहा तीन हजार रुपये मानधन दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फक्त आश्वासन देण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही हे मानधन मिळालेले नाही. यामुळे पाणलोट सचिव मानधन त्वरीत न मिळाल्यास आक्रमक भूमिका घेऊन कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन छेडणार असल्याचे पाणलोट सचिव सचिन शिर्के यांनी सांगितले.