15 व्या वित्त आयोग अंतर्गत जिल्ह्याला 24 कोटी

रत्नागिरी:- केंद्र व राज्य सरकारने 15व्या वित्त आयोगाचा बंदीत निधीचा हप्ता वितरित केला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला या आयोगाचा आणखी 24 कोटी 60 लाख निधी प्राप्त झाला आहे.

15व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना 80 टक्के तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी 10 टक्के प्रमाणे रक्कम विकासकामांसाठी मिळते. त्यापैकी सध्या दीड वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासक असल्याने एकही रूपयांचा निधी मिळालेला नाही. फक्त ग्रामपंचायतींना निधी मिळाल्याने त्या मालामाल झाल्या आहेत.
जिल्ह्यात 846 ग्रामपंचायती असून, वित्त आयोगाच्या निधीचे ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या प्रमाणे वाटप होते. एखाद्या गावाची लोकसंख्या 10 हजार असेल तर वर्षाला त्या गावाला 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळते. आतापर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीसह ग्रामपंचायतींना 322 कोटी रूपये धी प्राप्त झालेला आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींना 24 कोटी 60 रूपये निधी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाला आहे. आता लोकसंख्येनुसार त्याचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वाधिक निधी हा रत्नागिरी तालुक्याला मिळाला आहे. तब्बल 4 कोटी 27 लाख रूपये 94 ग्रामपंचायतींना मिळणार आहे. तर सर्वाधिक कमी निधी मंडणगड तालुक्याला मिळणार आहे.

तालुका ग्रामपंचायती निधी
मंडणगड. 49ब् 1 कोटी 2 लाख
दापोली 106 2 कोटी 85 लाख
खेड 114 2 कोटी 89 लाख
गुहागर 66 2 कोटी 3 लाख
चिपळूण. 130 3 कोटी 93 लाख
संगमेश्वर 126 3 कोटी 26 लाख
रत्नागिरी 94 4 कोटी 27 लाख
लांजा 60 1 कोटी 55 लाख
राजापूर. 101 2 कोटी 74 लाख