खेड:- ‘तू मला 15 लाख रुपये दे नाहीतर तुझ्या कात कारखान्याविरोधात तक्रार करून कायमचा बंद करायला लावीन’ अशी धमकी देणाऱ्या महिला व एका पुरुषावर दापोली पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. स्वाती विनोद वावडेकर (रा. मंडणगड), फुरखान मोमीन (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मंडणगड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद विशाल सूर्यकांत मालवणकर (36, व्यवसाय कात, रा. टेटवली, दापोली) यांनी पोलिस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेटवली ब्राह्मणवाडी येथील कात कारखान्याच्या गेटवर संशयित आरोपी स्वाती वावडेकर हिने फिर्यादी विशाल याला कंपनीच्या गेट अडवले. ‘तुझ्या विरोधात केलेल्या मागील तक्रारी वरुन ‘तु मला व विजय काते याला 15 लाख रुपये खंडणी दे, मी तुझ्याविरुध्द केलेल्या सर्व तक्रारी मागे घेईल व तुझ्या विरुध्द उपोषणाला बसणार नाही. आणि पैसे नाही दिलेस तर मी कोल्हापुर व नागपुर येथील कार्यालयामध्ये तक्रारी अर्ज करुन तुझा कात कारखाना कायमस्वरुपी बंद पाडीन’, अशी धमकी विशाल याला देऊन खंडणीची मागणी केली. तसेच शिवीगाळ केली. याप्रकरणी विशाल यांनी दापोली पोलिस स्थानकात स्वाती व फुरखान याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांविरोधात भादविकलम 384, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. याबाबतचा पुढील तपास पोहेकॉ पवार करीत आहेत.