रत्नागिरी:- रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार कोरोना कालावधीत सुरु केलेल्या विशेष गाड्या पूर्वीप्रमाणेच नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. १५ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार असून तिकिट दरही पुर्वीप्रमाणेच राहतील. मात्र सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझिंगचे नियम प्रवास करताना लागू करण्यात येणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाने कोरोना कालावधीसाठी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे तिकिट दरही अधिक होते. त्याचा भुर्दंड प्रवाशांना बसत होता. नुकतेच यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेत रेल्वेने विशेष गाड्या नियमित सोडण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार
मडगाव मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, रत्नागिरी मडगाव एक्स्प्रेस, मडगाव-रत्नागिरी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस, मडगाव-मंगळूरु सेंट्रल एक्स्प्रेस, मंगळूरु सेंट्रल ते मडगाव एक्स्प्रेस या गाड्या नेहमीप्रमाणे जुन्या वेळेनुसार आणि त्यावेळच्या तिकिट दरानुसार धावणार आहेत.