ॲड. विनय गांधी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

रत्नागिरी:- येथील प्रसिद्ध सरकारी वकील विनय  गांधी उर्फ गांधी बाबा (वय-६२) यांचे हृदयविकाराने कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपुर्ण रत्नागिरी शोकसागरात बुडाली आहे.

मूळचे पोलादपूर रायगड येथील असलेले विनय गांधी यांनी एलएलबी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कै. केतन घाग यांच्याकडे त्यांनी ज्युनिअरशिप केली. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र प्रॅक्टिसला सुरुवात करून आपल्या कौशल्याची विशेष छाप पाडली. सन 2015 साली त्यांची विशेष जिल्हा सरकारी वकील  म्हणून नियुक्ती झाली. या पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर प्रकरण तडीस नेण्याचे प्रमाण वाढले होते. कमी कालावधीत त्यांनी अनेकांना योग्य तो न्याय मिळवून दिला होता. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला असून बार असोसिएशनकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.