रत्नागिरी:- मच्छीमारी बोटीवर काम करण्यासाठी आगावून ५ लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दीपक बाबू तांडेल असे संशयिताचे नाव आहे.
ही घटना ६ मार्च ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत रत्नागिरीत घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नासीर अब्दूल गनी वाघू यांनी संशयित दीपक तांडेल याला २०२३-२४ वर्षाकरिता मच्छीमारी बोटीवर काम करण्यासाठी आगावू ५ लाख ४० हजाराची रक्कम दिली होती. मात्र संशयित स्वतः व इतर कामगार यांच्यासह कामावर आले नाही. तसेच दिलेली रक्कम ही परत न करता फसवणूक केली. या प्रकरणी नासीर वाघू यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांनी संशयित दीपक तांडेल याला अटक केली. न्यायालयात हजर केले
असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.