१४ कोटींची फसवणूक करणाऱ्या रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिकाला अटक

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील धामणसे, निवेंडी येथे बांधकाम प्रकल्पाची घोषणा करून गुंतवणूकदारांची १४ कोटी २८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या महेश नवाथे या रत्नागिरीतील बांधकाम व्यावसायिकाला गुरुवारी रत्नागिरी शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

महेश नवाथे यांच्याविरोधात एकूण ३४० तक्रारी दाखल होत्या. २०१६ साली आर्थिक गुन्हे शाखेने त्याला मुंबई येथे अटक केली होती. यानंतर पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरु होती. अनेक गुंतवणूकदारांनी ग्राहक मंचाकडे देखील त्याच्या विरोधात दाद मागितली होती. मात्र नायालयाच्या कोणत्याच तारखांना उपस्थित न राहता तो पोलिसांना देखील अनेक वर्ष गुंगारा देत होता. मात्र गुरुवारी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या टीमने या बिल्डरला मोठ्या शिताफीने पनवेल येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.