हॉटेलमधील कामगारांना मारहाण प्रकरणी बहीण – भावावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील काँग्रेस भवन येथील महेश लंच होम येथील कामगारांना शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी बहीण-भावा विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार 23 फेब्रुवारी रोजी रात्री 10.45 वा. घडली.

ओंकार मोरे (रा. सांबवाडी पेठकिल्ला, रत्नागिरी ) आणि त्याची नागवेकर नामक बहीण या दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात महेश दत्तात्रय शिरधनकर (56,रा.मुरुगवाडा, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी रात्री दारू पिऊन ओंकार याने हॉटेलमद्ये येऊन तुमच्याकडे जेवण काय आहे, असे विचारले. त्यानंतर मोठमोठ्याने शिवीगाळ करत हॉटेलमधील कामगार संदीप लक्ष्मण पाताडे (38,रा.सन्मित्र नगर, रत्नागिरी ) आणि मनोहर मधुकर मांडवकर (44, रा.काँग्रेस भवन, रत्नागिरी ) यांना प्लास्टिक पाईप आणि हातानी मारहाण केली. यात कामगारांचे कपडे फाटून त्यांची चांदीची चेन आणि हेडफोन तुटून नुकसान झाले. तसेच ओंकारच्या बहिणीनेही कामगारांना शिवीगाळ केली.