हिवताप कार्यालयातील भरतीत डावललेल्या 10 उमेदवारांचा कुटुंबियांसह आत्मदहनाचा इशारा

रत्नागिरी:-  सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयात कायम स्वरूपी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. पण त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून सन 1999 सालापासून आजपर्यंत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या आणि सरळसेवा भरती पकियेत उत्तीर्ण असलेल्या 10 उमेदवारांना डावलण्याचा पकार घडला आहे. या उमेदवारांनी येत्या 15 ऑगस्ट रोजी कुटुंबियांसहीत आत्मदहनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
 

या भरतीसाठी सन 2019 रोजी जाहिरात 100  टक्के पद भरतीसाठी देऊन हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचारी उमेदवारासाठी 100 टक्के मंजूर जागा पैकी 50 टक्के राखीव असतात. या करिता शासनाने 28/02/2021 रोजी केवळ 50 टक्के पदांची परीक्षा घेतली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून सन 1999 सालापासून आजपर्यंत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून काम करीत असणारे सरळ सेवा परीक्षेत 10 उमेदवार पास झालो आहोत. त्यामध्ये इकबाल चौघुले (खेड), विजय राउत (निवे संगमेश्वर), निलेश गुळेकर  (गावखडी रत्नागिरी), प्रशांत शिंदे (चिपळूण), अजित खुनम (भरणेनाका खेड), राजेश कनियरिकल (कारभाटले संगमेश्वर), सुरेश दैत (ओझर देवरुख, संगमेश्वर), मंगेश जाधव (मिरजोळे, रत्नागिरी), सचिन कदम ( चिपळूण), प्रसाद पाटोळे (वाडगाव लांजा) यांचा समावेश आहे. 6 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा हिवताप कार्यालयात नोटिस बोर्डावर यापैकी एकाही उमेदवारांचे नाव नाही. या यादीमध्ये बाहेरील जिल्हातील आमचे माहिती प्रमाणे बनावट कामाचा अनुभवाचा दाखला घेऊन पास असणारे उमेदवारांची नावे नोटिस बोर्डावर पात्र उमेदवार म्हणून कागद पडताळणीसाठी  13 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9.00 वा. बोलविले आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हा हिवताप कार्यालय अंतर्गत काम करणारे सन – 1999 ते 2000 पासून आजपर्यन्त काम करणारे व सरळसेवा परीक्षा पास उमेदवारांना बोलविले नसल्याचे म्हणणे आहे.  एवढे वर्ष काम करून सुद्धा आमच्यावर अन्याय होत असल्याने 15 ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्रदिन या दिवशी आमचे कुटूंबीय सहित राहणारे गावात आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.