रत्नागिरी:- धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात या कारणास्तव सकल हिंदू समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चा व जयस्तंभ येथील सभेसाठी प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. 10 व 12 वीच्या परीक्षा सुरु असून आणि जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने ही परवानगी नाकारण्यात आली आहे.
सोमवार 4 मार्च रोजी सकल हिंदू समाजातर्फे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ड्रगमुक्त रत्नागिरी, भूम अतिक्रमण, लव्ह जिहादमुक्त रत्नागिरीसाठी चलो रत्नागिरी असा नारा या वेळी देण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्त्या काजल हिंदुस्थानी मार्गदर्शन करणार होत्या.
यासाठी प्रातांधिकारी व पोलीस प्रशासनाकडे सकल हिंदू समाजाने परवानगी मागण्यात आली होती. मोर्चा मारुती मंदिर येथून सुरु होऊन माळनाका, जेलानाका मार्गे गोगटेकॉलेज, टिळक मेमोरियलवरुन जयस्तंभ या मार्गाने काढण्यात येणार होता. परंतु 10 व 12 वीच्या परीक्षा सुरु असून याठिकाणी असणारा शाळा व महाविद्यालयामध्ये आणि अभ्यासिकांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो असे पोलिसांनी म्हणणे सादर केले होते. त्याचप्रमाणे जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चो कलम 37 1 व 3 अन्वये मनाई आदेश 14 मार्चपयर्र्त लागू असल्याने आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने परवागनी देऊ नये असे पोलिसांचे मत होते. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकार्यांनी मोर्चा व सभेसाठी सकल हिंदू समाजाने मागितलेली परवानगी नाकारली आहे.