हिंदू कॉलनीनजीक मुलीच्या प्रकरणावरून दोन गटात जोरदार राडा

रत्नागिरी:- शहरातील हिंदू कॉलनीतील अमांत्रा बिल्डिंगनजीक मुलीच्या प्रकरणावरून दोन गटातील तरुणांमध्ये जोरदार राडा झाला. मुलीच्या प्रेमप्रकरणातून हा राडा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र जोरदार बाचाबाची झाल्यानंतर मात्र त्या मुलीने तिथून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू कॉलनीकडून मथुरा हॉटेल कडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास 10-12 जणांचं टोळकं जोरजोरात बोलत होते. एका मुलीचे अनेक तरुणांसोबत प्रेमसबंध होते. एकमेकांना तिच्याबद्दल समजल्यानंतर 10-12 तरुण आपल्या मित्रांसह जाब विचारायला त्या ठिकाणी आले होते असे तेथील तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

यावेळी त्या तरुणीला बोलावून घेण्यात आले. मुलगी त्या ठिकाणी येताच तरुणांमध्ये बाचाबाची सुरू झाली. जोरदार वादावादी झाली. 10-12 जणांच्या टोळक्यात मुलगी एकटीच होती. अनेकांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यानंतर पुन्हा आवाज वाढत होता असे बिल्डिंग मधून पाहणाऱ्या लोकांनी सांगितले. याबाबत व्हिडिओ ही काहींनी केले आहेत. जवळपास अर्धा तास या प्रकणावरून वाद सुरू होता. शेवटी एका मुलाच्या घरच्यांना ही बातमी समजली. नातेवाईक त्या ठिकाणी दुचाकीवरून आले. त्यांच्या सोबत एक महिला होती. तिने त्या तरुणांना चांगला दम भरला. आवाज वाढताच बिल्डिंगमधून अनेक जण घटना पाहण्यासाठी जमले होते. वाद अधिकच चीघळतोय प्रकरण हाताबाहेर जातंय आणि वाद जोरदार वाढणार असे वाटत असताना ती मुलगी तिथून जोरजोरात रडत घराच्या दिशेने पळून गेली.