रत्नागिरी:- तालुक्यातील हातीस येथील बाबरशेख दर्गा परिसरात मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज पपू चव्हाण (वय २०, रा. मुरुगवाडी, झोपडपट्टी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हातीस गावी बाबर शेख दर्गा परिसरात निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुणाकडे मद्य प्राशनाचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळून आला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.