हातखंबा येथे डंपरची ट्रकला धडक; एकजण जखमी

रत्नागिरी:- हातखंबा येथील ईश्वर धाब्यासमोर शुक्रवारी दिनांक ४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास मागून येणाऱ्या डंपरने पुढे असणाऱ्या ट्रकला धडक देत अपघात केला. यात एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

निवळीहुन हातखंब्याच्या दिशेने दोन्ही वाहने मार्गक्रमण करीत असताना ईश्वर धांब्यासमोर ट्रक (गाडी क्रमांक MH 14 BJ 4731) आला असता मागून येणारा डंपरने ( क्रमांक- MH10-CR-8970) धडक दिली. या अपघातात धडक देणाऱ्या डंपर चालक गणेश दिलीप मयेकर (वय 36 राहणार- पोमेंडी रत्नागिरी) हा स्वतः जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच तातडीने श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या चालक धनेश केतकर रुग्णवाहिका घेऊन दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने डंपरमधील जखमी चालकाला उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी घटनास्थळी हातखंबा टॅबचे पोलीस देखील दाखल झाले.