रत्नागिरी:- मुंंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथील दोन गाळे फोडले. दोन गाले फोडून चोरटयांनी हजारोंचा ऐवज लांबवला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांना घटनेची माहिती कळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
संकेत देसाई यांचे हातखंबा येथे दोन गाळे आहेत. दोन्ही गाळे भाडयाने देण्यात आले होते. यामध्ये एका गाळयात गाड्यांचे पार्ट व मॅकेनिकचा व्यवसाय होता तर दुसर्या गाळयात सामान ठेवण्यात आले होते. या दोन्ही गाळयांचे पत्रे फोडून चोरटयांनी गाळयात प्रवेश केला. आतील सामानाची चोरी करुन रोख रक्कम लंपास केल्याचे बोलले जात आहे. नेमका ऐवज किती गेला याची माहिती मिळू शकेलेली नाही. मंगळवारी मध्यरात्री हे गाळे फोडण्यात आले. बुधवारी पहाटे 6 वाजण्याच्या ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा सुरु आहे.