हातखंबा येथील अपघात प्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- मुंबई- गोवा महामार्गावर हातखंबा दर्ग्याच्या पुढे गुरववाडी रस्त्यावर डंपर टेम्पोवर पडला. या अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी (ता. ४) मे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हातखंबा दर्गा येथील रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मालकीचा टेम्पो (क्र. एमएच-०९ एफएल ४०६८) घेऊन चालक निलेश प्रकाश साळुंखे (रा. नांदरे ता. मिरज, जि. सांगली ) हे घेऊन रत्नागिरी ते सांगली मुंबई गोवा महामार्गावरुन जात असताना. शनिवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पाली दिशेकडून येणाऱा डंपर (क्र. एमए-३० बीडी ४२१४) वरिल चालकाने डंपर भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला नेऊन मातीच्या ढिगाऱ्यावरुन डंपर टेम्पोवर पडून अपघात झाला. या अपघातात फिर्यादी गणेश चंद्रकांत कोळी (वय ३४, रा. नांदरे, ता. मिरज, जि. सांगली) हे गंभीर जखमी झाले. तर अपघात घडताच डंपर चालकाने पलायन केले. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी फिर्यादी गणेश कोळी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.