रत्नागिरी:- हातखंबा व पाली-गराटेवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र संभाजी मालप (रा. निवळी, मालपवाडी, रत्नागिरी) व सिद्धनाथ काशिनाथ गराटे ( ३६, रा. पाली गराटेवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना बुधवारी (ता. १४) साडे पाच ते सहाच्या सुमारास हातखंबा व पाली गराटेवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल मंदार मोहिते आणि सहायक पोलिस फौजदार मोहन कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.