रत्नागिरी:- तालक्यातील हातखंबा, कोतवडे आणि नाणीज येथे विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण २२ लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. तीन संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
रवींद्र महादेव सनगरे (३७, रा. हातखंबा-सनगरेवाडी, रत्नागिरी), दत्ताराम देवजी परकर (वय ६७, रा. कुंभारवाडी- कोतवडे), प्रदीप हरिश्चंद्र सरफरे (५३, रा. सरफरेवाडी-नाणीज, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. २०) दुपारी दोन ते साडेपाचच्या सुमारास हातखंबा, कोतवडे, नाणीज येथे घडल्या आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित मद्य विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या आधारे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ हजार १४० रुपयांची २२ लिटर दारु जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजावली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.