हर्णैत फटाके लावण्यावरून वाद, तिघांवर गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील हर्णे येथील भवानी चौकात मुलांना फटाके वाजविण्याचे बंद करा सांगितल्याच्या रागातून मारहाण झाल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्णे भवानी चौक येथे रात्री २.३० वाजण्याच्या दरम्यान मुले फटाके वाजवत होते. या मुलांना तुम्ही फटाके वाजविणे बंद करून बाजूला व्हा असे जहूर करीम सुर्वे यांनी सांगितले. याचा राग येऊन विकी धाडवे, ऋतिक पवार व गणेश बोंबले यांच्यासह सात ते आठ जणांनी ज़हूर सुर्वे यांना मारहाण केली.

तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सुर्वे यांच्या गाडीवर लाथाही मारल्याचे सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. सुर्वे यांना मारहाण करण्याकरिता विकी धाडवे व ऋतिक पवार हे येत असताना नाल्यामध्ये पडले. यात त्यांना दुखापत झाल्याचेही सुर्वे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीनुसार विकी धाडवे, ऋतिक पवार गणेश बोंबले सर्व राहणार हर्णे यांच्यावर बी एन एस कलम ११५ (२) ३५१ (२) ३५२ १८९ (२) १९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक डी डी पवार करीत आहेत.