हर्णे समुद्र किनारी पार्किंगच्या वादातून पुण्यातील तरुणांवर कोयत्याने वार

दापोली:-रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करण्याच्या वादावारून पुण्यातील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून दोन्ही तरुण थोडक्यात बचावले.

या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै समुद्र किनाऱ्याच्या रस्त्यावर ही घटना रविवारी सायंकाळी घडली. भुभम परदेशी (वय २९), सूरज काळे (वय २५) अशी हल्ला झालेल्या जखमी तरुणांची नाव आहे. हे दोन्ही तरुण पिंपरी चिंचवड येथील राहणारे आहे.

पिंपरी चिंचवड येथील पाच पर्यटक हर्ण समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र आज ते पुण्याकडे जायला निघाले होते. त्याचवेळी सुराली गार्डन जवळ एक ईनोव्हा गाडी रस्त्यावर लावण्यात आल्याने गाडी बाजूला करं, असे सांगितले. आपल्याला गाडीला बाजूला कर असे सांगितल्याचा राग राग मनात धरून पाठलाग करत टोळक्याने कोयत्याने हल्ला चढवला.

 शुभम परदेशी, सूरज काळे या हल्लयात जखमी झाले आहेत. त्यांच्या हातावर कोयत्याने वार करण्यात आला. तसंच गाडीची काचही फोडण्यात आली. या घटनेनंतर दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या दोन्ही पर्यटकांवर खुनी हल्ला करणारे सातारा जिल्ह्यातील असल्याचे समजले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.