हरावडे खून प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

दापोली:- तालुक्यातील लाडघर येथील सुनील गोवळे याने गावातील विठ्ठल हरावडे याच्यावर किरकोळ कारणावरून कुऱ्हाडीने वार करत खून केल्याचा आरोप होता. येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी त्याची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

ही घटना २५ ऑगस्ट २०१८ मध्ये घडली होती. या खूनप्रकरणी दापोली पोलिसांनी सुनील गोवळे यास अटक केली होती. दापोली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खेड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांच्या साक्षीत तसेच त्यांच्या घेण्यात आलेल्या उलट तपासात विसंगती आढळली. आरोपीचे वकील प्रियेश तलाठी व अॅड. आर. आर. नटे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. .