स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील तिघांना न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी:- स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील तिघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने बुधवारी 21 सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही संशयितांना आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत, रुपेश सावंत, प्रमोद रावणंग यांना 11 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने 19 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर सोमवार 19 रोजी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आणखी पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. कोर्टाने 2 दिवसांची मुदत वाढवून देत बुधवार 21 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज 21 रोजी त्यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.