स्टरलाईटच्या जमीनीबाबत निकालानंतर निर्णय

ना. उदय सामंत; जमीन परत मिळण्याबाबतचा कोणताही दावा नाही

रत्नागिरी:- झाडगाव एमआयडीसीतील स्टरलाईट प्रकल्पाची सगळी जमीन मूळ मालकांनी परत मागितलेली नाही. ती जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे. 28 नोव्हेंबरला न्यायालयात निकाल होणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ, असे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ऑनलाईन झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, स्टरलाईट जमीनमालकांचा सगळी जमीन आम्हाला मिळाली पाहिजे, असा कुठलाही दावा नसल्याचा सामंत यांनी केला.स्टरलाईट कंपनीचा प्रकल्प हा माझ्या मतदार संघातील आहे. याबाबत बाबू पडवेकर, श्री. सावंत, राजेंद्र अहिरे हे सर्व मला भेटलेले होते. मीत्यांना सांगितले, 28 तारखेचा निकाल होऊ दे, या निकालानंतर भविष्यात तेथे काय करायचं हे आपण सगळ्यांनी बसून ठरवू, अशा प्रकारचीमी विनंती केली होती. त्याला त्यांनी मान दिलेला आहे.ती जमीन मूळ मालकाला मिळू शकते की नाही ते एमआयडीसी ठरवणार. स्टरलाईटबाबत 1992 मध्ये जे वेदांताचेच मालक आहेत त्याअनिल अगरवाल यांनी स्टरलाईट प्रकल्प रत्नागिरीत आणला. त्याला विरोध झाला आणि प्रकल्प तामिळनाडूत नेला. त्या दिवसापासून त्याजागेवर काहीच झालेले नाही. ती जागा त्यांच्याकडेच पडून आहे. जिल्हा न्यायालयामध्ये ती जागा शासनाने परत घ्यावी, असे आदेश दिलेलेआहेत. त्याच्या विरोधामध्ये अगरवाल हायकोर्टात गेलेले आहेत. 28 नोव्हेंबरला या महिन्यातील  तारीख दिलेली आहे. त्यामुळे 28 तारखेलाकाय तो निर्णय होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.