स्कूल बस-रिक्षा अपघातात ५ विद्यार्थी जखमी

खेड:- तालुक्यातील सुकीवली मार्गावर विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी खासगी स्कूल बस व रिक्षा यांच्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात ५ विद्यार्थी जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी भरणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातातील जखमी विद्यार्थी शहरातील दोन नामवंत विद्यालयात शिक्षण घेत आहेत. स्कूल बस व रिक्षाने विद्यार्थी आपापल्या घरी जात असताना दोन वाहनांमध्ये अपघात घडला. अपघाताचे वृत्त कळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेतली. विद्यालय व्यवस्थापनचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी उशिरापर्यंत या बाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.