रत्नागिरी:- मुलाला शाळेत सोडण्यासाठी सोमेश्वर बसस्टॉपवर गेलेल्या फिर्यादी दहा जणांनी मारहाण केली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निसार महम्मद हुश्ये, आसिफ इकबाल साखरकर, बशीर इकबाल साखरकर, आरमान सैफ नाईक, तैरीण सैफ नाईक, तेहसीन निसार हुश्ये, यास्मीन इकबाल साखरकर, अबिदा फणसोपकर, शाहीद निसार हुश्ये, इकबाल साखरकर, इमरान सैफ नाईक (सर्व रा. सोमेश्वर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. २४) पावणेबाराच्या सुमारास सोमेश्वर बस स्टॉप येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसीम अब्दुल मजीद वस्ता हे त्यांचा मुलगा अयमान वसीम वस्ता यास शाळेत सोडण्याकरिता सोमेश्वर बस स्टॉप येथे गेले असता अकरा संशयित तेथे आले व फिर्यादी यांना संशयित बशीर इकबाल साखरकर व आसिफ इकबाल साखरकर यांनी पीर यात्रा (उरुस) आपल्या गावाचा आहे. तुम्ही तेथे जावून भानगडी करु नका असे सांगितले. त्या कारणावरुन फिर्यादी यास स्टील रोल व प्लॅस्टीक पाइप, बोटामध्ये घातलेले कोणतेतरी लोखंडी हत्यार तसेच हाताच्या ठोशाने वसीम वस्ता यांना मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वसीम वस्ता यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अकरा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.