रत्नागिरी:- सोमेश्वर येथे शनिवारी पिंपळाचे झाड कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मीकांत वेदरे यांचे आज उपचारादरम्यान दु:खद निधन झाले.
सोमेश्वर मराठी शाळेजवळ पिंपळाचे भलेमोठे झाड अंगावर पडल्याने दुचाकी चालक प्रतिक मयेकर आणि पायी जाणारे लक्ष्मीकांत वेदरे हे दोघे गंभीर जखमी झाले होते तर गुरुनाथ भाटकर किरकोळ जखमी झाला होता. प्रतिक मयेकर ह्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे तर लक्ष्मीकांत वेदरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.