रत्नागिरी:- तालुक्यातील सोमेश्वर येथील पर्यात आंघोळ करणार्या महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणार्या संशयिताला न्यायालयाने सोमवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.ही घटना रविवार 3 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 5.30 वा.सुमारास घडली होती.
नईम नदीम गडकरी (29,रा.सोमेश्वर मुस्लिमवाडी आझाज कॉलनी स्टॉपजवळ,रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात पिडीतेने ग्रामीण पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सायंकाळी त्या आणि त्यांच्या सोबत असलेल्या लहान मुली सोमेश्वर येथील पर्यात आंघोळ करत होत्या.त्यावेळी नईम गडकरी तिथे आला.त्याने पिडीतेला इथे आंघोळ करायची नाही असे सांगितले.त्यावर पिडीतेने तुम्ही सांगणारे कोण व कुठून आलात असे विचारले.तेव्हा नईमने तिला शिवीगाळ करत तिचा पाठलाग करुन अंगावरील गाउन फाडला.तसेच तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन शिवीगाळ करत कापून टाकण्याची धमकी दिली होती.याप्रकरणी पिडितेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी रात्री 8.43 वा.नईमला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले