रत्नागिरी:- तालुक्यातील सैतवडे येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्या विरोधत जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार 27 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा.करण्यात आली.
अरुण काशिनाथ झगडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस नाईक प्रसाद सोनावले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी रात्री संशयित हा खंडाळा ते सैतवडे जाणार्या रस्त्यावर दारुच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी हेलकावे खात जात असताना मिळून आला होता. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 कलम 84 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.