रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. शनिवारी रात्री आलेल्या अहवालानुसार तालुक्यात 20 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आले आहेत. यात सैतवडे येथे रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
सैतवडे येथे कोरोनाचे 3 नवे रुग्ण सापडून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी सैतवडे गावात कोरोना रुग्ण सापडून आला होता. यानंतर या ठिकाणच्या काही ग्रामस्थांचे स्वॅब घेण्यात आले होते. यात नव्याने तीन रुग्ण सापडून आले आहेत.
सैतवडे गावसह आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. शहर पोलीस स्थानकात नियुक्ती असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय कारवांचीवाडी येथे 1, साखरपा 1, टिळक आळी 1, जेके फाईल 1, ओसवालनगर 1, राजापूर 1, नाचणे पॉवर हाऊस 1, पूर्णगड 1, सन्मित्र नगर 1, नाचणे 1, शेट्ये नगर 1, खेडशी 1, निवळी 1, तारवेवाडी हातखंबा 1, आंबेकरवाडी आणि गोळप या ठिकाणी प्रत्येकी 1 पॉझिटिव्ह रुग्ण सापडून आला आहे.