रत्नागिरी:- माजी आमदार उदय सामंत यांना जाहीर समर्थन दिल्यानंतर उपजिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप यांचे पद काढून त्याजागी माजी समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती.
मात्र प्रकाश रसाळ यांनी सेनेला धक्का देत थेट जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना पत्र लिहीत नव्या नियुक्तीचा राजीनामा दिला आहे. अवघ्या काही तासात हा राजीनामा दिला गेल्याने सेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.