सेना ग्रामीण उपजिल्हाप्रमुख पदावर सुजित कीर यांची नियुक्ती

रत्नागिरी:- प्रकाश रसाळ यांनी नियुक्तीनंतर अवघ्या काही तासात राजीनामा दिल्यानंतर आता उपजिल्हा प्रमुख (ग्रामीण) पदावर सुजित कीर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा सेनेकडून करण्यात आली आहे.

उदय सामंत यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना पाठिंबा देणाऱ्या उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप यांच्यासह शहरप्रमुख बिपीन बंदरकर, कांचन नागवेकर आदि पदाधिकारी यांचे पद काढून घेण्यात आले होते. उपजिल्हा प्रमुख पदावर सामंत यांच्याच गटातील प्रकाश रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र रसाळ यांनी काही तासात राजीनामा दिल्याने आता या पदावर सुजित कीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुजित कीर यांना युवा सेनेत काम करण्याचा चांगला अनुभव आहे.