सुकांत सावंत यांच्या पत्नी स्वप्नाली सावंत बेपत्ता

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत सावंत यांच्या पत्नी सौ स्वप्नाली सुकांत सावंत या मागील ९ दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्या अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय क्षेत्रात खळाबळ उडाली आहे.

पती सूकांत सावंत यांनी दिलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांचा शोध सुरू केला होता. दिनांक १ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता सावंत अचानक बेपत्ता झाल्या होत्या. मात्र आता या प्रकरणात पती सुकांत यांची पोलीस कसून चौकशी करीत असून काही तासातच या प्रकरणाचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.