सिमेंट ट्रक पलटी होऊन अपघात; गाडीखाली अडकून चालक ठार

देवरुख:- महामार्गावरील धुक्याचा अंदाज न आल्याने सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात घडला. दाट धुके व काळोख यामुळे रस्त्याचा अंदाज आला नसल्याने रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक गाडीखाली अडकून जागीच ठार झाला.

हा अपघात रात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाला. अपघाताचा आवाज झाल्याने आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी धावले मात्र चालक गाडीखाली अडकल्याने मदतकार्य करन्यास अडचण येत होती. गेले आठ दिवस परिसरात थंडी आणि धुके मोठ्या प्रमाणात पडत असून याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.अजय नीलकंठ शिंदे (वय-२५) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. हा मूळचा संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूरचा रहिवासी आहे.