रत्नागिरी:- प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजना ठिबक व तुषार संच या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकर्यांच्या अर्जाचे प्रमाण कमी असुन अर्ज संख्या वाढविण्याकरीता मोहीम स्वरूपात प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्हांतर्गत कृषि विभागामार्फत केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात. शेतकर्यांनी या सर्व योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक असून यासाठी शेतकरी स्वतः किंवा आपले सरकार केंद्रामार्फत अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर निवड झाल्यानंतर शेतकर्यांला तसा संदेश येतो. त्या नंतर त्यांनी कागदपत्र पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. योजनेचा शेेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कागदपत्र सादर केल्यानंतर पूर्वसंमती देण्यात येते. पुर्वसंमती दिल्यानंतर शेतकर्यांनी यंत्र खरेदी केल्यानंतर क्षेत्रीयस्तरावर मोका तपासणी करून त्यासंबंधीचे कागदपत्र पोर्टलवर सादर केल्यानंतर अनुदान थेट शेतकन्यांचे खात्यावर वर्ग करण्यात येते. याच धर्तीवर प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार संच बसविण्यासाठी देखील बहुधारक शेतकर्यांना 45 टक्के अल्प, अत्यल्प भुधारक शेतकर्यांना 55 टक्के अनुदान प्रवर्गनिहाय देण्यात येते व याला पुरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत शेती सिंचन योजनेमधुन अनुक्रमे 75 टक्के व 80 टक्के अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ इच्छुक शेतकर्यांनी घ्यावा.
प्रति थेंब अधिक पिक सुक्ष्म सिंचन योजना ठिबक व तुषार संच या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकर्यांच्या अर्जाचे प्रमाण कमी आहे. यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याचे अर्ज घेण्याकरीता 15 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2022 या पंधरावड्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. कृषि सहाय्यकामार्फत प्रत्येक गावातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकर्यांना योजनेची माहिती देऊन पोर्टलवर अर्ज करण्यात येणार आहे.
कृषि विभागाच्या विविध योजनांच्या अधिक माहितीसाठी ग्रामपातळीवर कृषी सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक, मंडल स्तरावर, मंडळ कृषि अधिकारी आणि जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.