रत्नागिरी:- उबाठा गटाचे नवनियुक्त तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी तालुकाप्रमुख पदाचा कारभार हाती घेतल्या नंतर आता नवा वाद निर्माण झाला आहे. साळवी स्टॉप शिवसेना शाखा ही बाळा साहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीत स्थापन करण्यात आली आहे. याच शाखेतून शिवसेनेने कारभार चालवला. आता आपण आपल्या कारभाराची सुरुवात देखील याच शाखेतून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून करणार असल्याची रोखठोक भूमिका तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी मांडली आहे.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता साळवी स्टॉप शाखेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे एक हजार कार्यकर्ते आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी हजर राहणार आहेत. त्या स्वीकारण्यासाठी आपण शाखेत हजर राहणार असून भविष्यात याच शाखेतून आपण आपला कारभार सुरू ठेवणार असल्याचे शेखर घोसाळे यांनी सांगितले.
तर यावर प्रतिक्रिया देताना शिंदे शिवसेनेचे नेते बंड्या साळवी यांनी सांगितले की, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी शाखेत यावे त्यांचं स्वागतच असेल. त्यांनी यावं शुभेच्छा स्विकरव्यात. त्यांनी त्यांचं काम काम करावं आम्ही आमचं काम करू. आम्ही दोघं वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमची मन दुभंगलेली नाहीत अशी प्रतिक्रिया प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली.