रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथे नेक्सा शोरूम समोर रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या चप्पलच्या दुकानाला शनिवारी रात्री अचानक आग लागली. रनपच्या अग्निशमन यंत्रणेने आग विझवली असली तरी या आगीत दुकानातील माल मोठ्या प्रमाणावर जळाला.
काही दिवसांपूर्वीच साळवी स्टॉप येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेत चप्पलचे दुकान टाकण्यात आले होते. बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांचे हे दुकान असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी रात्री या दुकानाला बाहेरून लावलेल्या कापडाने पेट घेतला आणि बघता बघता सम्पूर्ण दुकान पेटले. रस्त्यालगत आगीचे लोळ उठल्याने एकच गडबड उडाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रनपच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले मात्र या आगीत दुकानातील बहुतांश माल जळून खाक झाला.