सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन; तरुणाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहराजवळील उद्यमनगर-चंपक मैदान येथे मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन सुनिल मकवाना (वय २७, रा. विश्वनगर, नाचणे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २८) रात्री साडेआठच्या सुमारास उद्यमनगर चंपकमैदान येथील रस्त्यालगत निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनिल मकवाना सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना सापडला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस बजावली आहे.