सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन,
चौघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजिकच्या चंपक मैदान या सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यासाठी बसलेल्या चौघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मंगळवार २२ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता करण्यात आली . शुभम चंद्रकांत देसाई (२३) , तेजस चंद्रकांत देसाई ( २८) (दोन्ही रा . झाडगाव , रत्नागिरी ) , सैफ अशरफ काझी ( २९ , रा . राजापूरकर कॉलनी उद्यमनगर ) , आकिब शौकत अलजी ( २६ , रा . उद्यमनगर , रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत . मंगळवारी रात्री ग्रामीण पोलिस चंपक मैदान परिसरातून गस्त घालत असताना त्यांना हे दोघेही आपल्या पुढे दारुच्या बाटल्या ठेवून पित असताना दिसून आले . त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .