रत्नागिरी:- तालुक्यातील देवूड लावगण येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या वृद्धा विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय सदाशि देसाई (वय ६१, रा. देवूड लावगण, देसाईवाडी, रत्नागिरी) असे संशयित वृद्धाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ९) दुपारी साडेतीनच्या सुमारास लावगण देसाईवाडीचे स्टॉप येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वृद्ध सार्वजनिक ठिकाणी देशी मद्यपान करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रिया सुर्वे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वृद्धा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.