रत्नागिरी:- शहरातील जाकिमिऱ्या अलावा तळेकरवाडी येथे सामायिक घर आणि जमीन जागेच्या वादातून चुलतभावाने त्याच्या पत्नीसह चार जणांनी एकास मारहाण केली. ही घटना ११ एप्रिल रोजी रात्री घडली. जयेश अंकुश पाटील, जान्हवी जयेश पाटील, संजना सदानंद पाटील, सदानंद अंकुश पाटील (सर्व रा. जाकिमिऱ्या) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात सूर्यकांत लहू पाटील (४५ जाकीमिऱ्या, अलावा तळेकरवाडी) शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, ते घरात एकटे सामाईक हॉलमध्ये बसलेले असताना जमीन जागेच्या वादाचा राग मनात धरून त्यांचा चुलतभाऊ जयेश अंकुश पाटील याच्यासमवेत जान्हवी जयेश पाटील, संजना सदानंद पाटील यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून, सदानंद अंकुश पाटील याने फिर्यादीला लोखंडी शिगेने डोक्यात मारहाण करून तसेच लाकडी दांडक्याने आणि खुर्चीन सूर्यकांत यांना मारहाण केली. तर फिर्यादींचा भाऊ दीपक लहू पाटील, भावजय दीक्षा दीपक पाटील आणि पुतण्या आशुतोष पाटील हे घरी आल्यावर त्यांनाही शिवीगाळ करत धमकी देऊन मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.