सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण

तरुणीशी गैरवर्तनाचा आरोप ; बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल

रत्नागिरी:- एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्याने एका तरुणीशी गैरवर्तन केल्याचा आक्षेप घेऊन त्या पदाधिकाऱ्याला तरूणीच्या नातेवाईकांनी बेदम चोप दिला. शहरातील कॉंग्रेसभुवन येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. त्यामुळे बेशुद्धावस्थेत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात हलविले आहे.

घटनास्थळावरुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार, त्या पदाधिकाऱ्याने कामाला असलेल्या मुलीला दोन महिन्याचा पगार दिला नव्हता. तसेच तिच्याशी गैरवर्तन केल्याचे बोलले जाते. याबाबत तरुणीने आपल्या घरी सांगितले. सोमवारी दुपारी नातेवाईकांनी येऊन त्या पदाधिकाऱ्याला चोप दिला. या मारहाणीत पदाधिकारी गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ त्याला उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अधिक उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्यापही तो पदाधिकारी बेशुद्ध आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.