सापूचेतळे येथे किरकोळ कारणातून मारहाण; 6 जणांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील सापूचेतळे येथे किरकोळ कारणातून एकमेकांना मारहाण केल्याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार देण्यात आला असून एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवार 30 डिसेंबर रोजी दुपारी 3 वा. सुमारास घडली.

शिवाजी शंकर माने (32),दिपक शिवाजी माने (28), एक महिला (सर्व रा.नाचणे पांडवनगर,रत्नागिरी) आणि आकाश रतन चव्हाण (28),विकास रतन चव्हाण, एक महिला (सर्व रा.मिरजोळे एमआयडीसी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 6 संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश रतन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,ते आपल्या टेम्पोतून उसाचा रस गावोगावी भरणार्‍या बाजारात जाउन विक्री करण्याचा व्यवसाय करतात. सोमवारी ते सापूचेतळे येथे उसाचा रस विक्री करत असताना त्यांच्या टेम्पोच्या बाजुलाचा भाजी विक्रीसाठी ठेवलेल्या क्रेटची त्यांना अडचण होउ लागली. त्यामुळे त्यांनी तो बाजुला सरकवला. याचा राग आल्याने संशयित शिवाजी शंकर माने, दिपक माने आणि एका महिलेने तेथील भाजी कापण्याच्या सुरीने आकाश चव्हाण यांच्या कपाळावर मारुन दुखापत केली.

याप्रकरणी शिवाजी माने यांनी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी दुपारी ते भाजी विक्री करत असताना त्यांनी आपला क्रेट त्याठिकाणी ठेवला याचा राग आल्याने आकाश चव्हाण,विकास चव्हाण आणि एका महिलेने तुमचा भाजीचा क्रेट बाजुला कर असे सांगून उसाच्या बांबूने त्यांना मारहाण केली.