रत्नागिरी:- रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवृत्त 23 कर्मचार्यांना पुढील आयुष्यातील जगण्याचा आशेचा किरण मिळाला आहे. शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या थकीत तिसर्या हफ्त्याची 1 कोटी 14 लाख 42 हजार रुपये रत्नागिरी नगर परिषदेला वितरित करण्यात आले आहेत.
निवृत्त पोलिस कर्मचार्यांचे सुमारे 2 कोटी रुपये रनपकडून मिळणे बाकी आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी नगर परिषदेसह चिपळूण, दापोली, खेड, राजापूर नगर परिषद आणि मंडणगड नगर पंचायतीला सातव्या वेतन आयोगाच्या तिसर्या हफ्त्यापोटी 2 कोटी 75 लाख 46 हजार रुपये वितरीत झाले
आहेत.
रत्नागिरी नगर परिषदेतील एकूण 23 निवृत्त कर्मचार्यांना उपदान, रजा विक्री, रजा रोखीकरणचे सुमारे 2 कोटी रुपये द्यायचे आहेत. काही कर्मचार्यांचे या रकमेची वाट पाहत आयुष्य संपले. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाचा जो काही सातवा हफ्ता आला आहे त्यातून या निवृत्त कर्मचार्यांना रोखीत रक्कम मिळणार आहे. त्याचबरोबर कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांचा हा हफ्ता त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीत जमा होणार आहे.
सातवा वेतन आयोग 2016 पासून लागू झाला. या आयोगाच्या तिसरा हफ्ता जुलै 2021 मध्ये देय होता. हा रखडलेला हफ्ता आता कर्मचार्यांना मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी नगर परिषदेसह चिपळूण, दापोली, खेड, राजापूर नगर परिषद आणि मंडणगड नगर पंचायतीला सातव्या वेतन आयोगाच्या तिसर्या हफ्त्यापोटी 2 कोटी 75 लाख 46 हजार रुपये वितरीत झाले आहेत. रत्नागिरी नगर परिषदेला 1 कोटी 14 लाख 42 हजार रुपये, चिपळूण 85 लाख 9 हजार, दापोली 7 लाख 78 हजार, खेड 31 लाख 93 हजार, राजापूर 3 लाख 54 हजार, मंडणगड नगर पंचायतीला 75 हजार रुपये मिळाले आहेत.