साखरपा:- साखरपा बौद्धवाडी येथे जंगलात लागलेल्या भीषण वणव्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास लागलेला वणवा बुधवार सकाळपर्यंत पेटत होता. वणव्याचे कारण मात्र समजले नसल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
यामध्ये परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात आंबा,काजू,फणस आदी झाडे आगीची भक्ष्यस्थानी पडून लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच ग्रामपंचायतीची पाण्याची सुमारे 70 ते 100 मीटर लाईन जळून खाक झाली आहे.
साखरपा सरपंच विनायक गोवरे, तलाठी एस. टी.पवार, कृषी सहाय्यक श्री. डोंबाळे, पोलीस पाटील शैलजा पवार, कोतवाल शिवराज दळवी आदी उपस्थित पंचनामा करण्यात आला आहे व तहसीलदार कार्यालय येथे पंचनामा पाठविण्यात आला. त्यामुळे तेथील स्थानिकांनी नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे महसूल खात्याकडून नुकसान भरपाई कधी पर्यंत मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे